Ticker

6/recent/ticker-posts

HSC EXAM 2025 : मार्च २०२५ बारावी बोर्ड परीक्षा आजपसून सुरू ; राज्यभरात कडक नियमावली लागू


HSC EXAM 2025
HSC EXAM 2025


- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२५ बारावी परीक्षा ११ फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. यंदा परीक्षा नियोजित वेळेपेक्षा १० दिवस आधी सुरू होत असून निकालही लवकर जाहीर करण्याचा मानस आहे. १५ मेपर्यंत बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
राज्यातील पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांत परीक्षा घेतली जाणार आहे. ३३७३ मुख्य परीक्षा केंद्रे आणि ३३७६ परीक्षा उपकेंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे.

विद्यार्थ्यांची संख्या आणि शाखावार वर्गीकरण

यंदाच्या बारावी परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
त्यापैकी –

• विज्ञान शाखा – ७,६८,९६७ विद्यार्थी
• कला शाखा – ३,८०,४१० विद्यार्थी
• वाणिज्य शाखा – ३,१९,४३९ विद्यार्थी
• किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम – ३१,७३५ विद्यार्थी
• टेक्निकल सायन्स – ४,४८६ विद्यार्थी

गेल्या परीक्षांमध्ये काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळल्याने यंदा कडक नियम लागू करण्यात आले आहेत. गैरमार्गाचा वापर होणाऱ्या केंद्रांवर परीक्षा केंद्र मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल.
संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यभर २७१ भरारी पथके नियुक्त करण्यात आली असून प्रत्येक विभागीय मंडळात विशेष भरारी पथके आणि दक्षता समित्या कार्यरत राहणार आहेत.

विशेष सुविधा – आजारी किंवा अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा

जे विद्यार्थी वैद्यकीय, व्यापारिक किंवा तत्सम कारणांमुळे नियोजित तोंडी, प्रकल्प किंवा अन्य परीक्षा देऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी १२,१५ आणि १७ मार्च रोजी ‘आऊट ऑफ टर्न’ परीक्षा आयोजित केली जाईल.

बारावी परीक्षा कालावधी – ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५

बारावी परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्चपर्यंत चालणार आहे. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.


Post a Comment

0 Comments