अहेरी, १५ फेब्रुवारी २०२५: नॅसकॉम फाउंडेशनतर्फे आकांक्षी ब्लॉक (Aspirational Block_Aheri) पंचायत समिती येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मोबिलाईझर, रोजगार सेवक आणि इतर सहभागींना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करणे हा होता. स्मार्टफोन, इंटरनेट, डिजिटल पेमेंट, शासकीय सेवांची ऑनलाइन उपलब्धता, सायबर सुरक्षा यासारख्या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.
या प्रशिक्षण सत्रादरम्यान, सहभागींना डिजिटल साधनांचा व्यावहारिक वापर कसा करावा याविषयी शिकवण्यात आले. यामुळे ते नवीन तंत्रज्ञानाविषयी जागरूक होऊन स्वावलंबी बनू शकतील. कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी उत्स्फूर्तपणे सामील झाले होते.
नॅसकॉम फाउंडेशनचा हा उपक्रम डिजिटल इंडिया मोहिमेला गती देण्यासाठी आणि आकांक्षी ब्लॉकमध्ये तंत्रज्ञानाच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. अहेरी ब्लॉकमध्ये काम करणाऱ्या मास्टर ट्रेनर कु. शुभांगी रामगोनवार यांनी उपक्रमात उपस्थित असलेल्या मोबिलाईझर, रोजगार सेवक, पंचायत समिती सदस्य यांना प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती अहेरीचे बीडीओ मान. जुवारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
हा उपक्रम डिजिटल साक्षरता आणि जनजागृती प्रशिक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला आहे. यामुळे अहेरी ब्लॉकमधील लोकांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वावलंबी बनण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
0 Comments