Ticker

6/recent/ticker-posts

Kerala Girl Diat News :youtube वर बघितलेला डायट व्हिडिओ तिच्या मृत्यूचं महत्त्वाचं कारण ठरल!

 
Kerala Girl Diat News :youtube वर बघितलेला डायट व्हिडिओ तिच्या मृत्यूचं महत्त्वाचं कारण ठरल!

श्रीनंदा एम केरळ मध्ये राहणारी 18
वर्षांची मुलगी नुकतीच बारावी पास झालेली
डिग्रीच्या फर्स्ट इयरला शिकत असताना
उज्जवल भविष्याची स्वप्न बघणारी मुलगी पण
या 18 वर्षांच्या श्रीनंदाचा 9 मार्चला
मृत्यू झाला जवळपास बारा दिवस ती मृत्यूशी
झुंज देत होती पण ही झुंज अपुरी पडली
श्रीनंदाचा मृत्यू झाला तेव्हा तिचं वजन
जवळपास 24 किलोच होतं मृत्यूशी झुंजावं
इतकी ही ताकद तिच्यात उरली नव्हती पण या
सगळ्याचं कारण काय काय होतं तर डायट
श्रीनंदाने बारीक होण्याच्या नादामध्ये
youtube वर बघितलेला डायट हा डायट आपल्या
शरीरासाठी योग्य आहे का याचे काही
दुष्परिणाम होऊ शकतात का याबद्दल कसलाच
विचार न करता तिनं हा डायट केला नुकतेच
तिच्या मृत्यूचं कारण ठरलं केरळच्या
श्रीनंदासोबत नेमकं काय घडलं सहा महिने ती
उपाशी का होती आणि तिच्या मृत्यूचं
महत्त्वाचं कारण ठरलेला मानसिक आजार आहे
काय या सगळ्या गोष्टी  जाणून
घेऊ 

डायट हा विषय आता नवा राहिलेला
नाही यातही सोशल मीडियावर डायटचे रील्स
व्हिडिओज यांची मोठ्या प्रमाणावर चलती
असते डायटच्या टिप्स देणारे सोशल मीडिया
इन्फ्लुएंसर सुद्धा इथेच असतात आणि डायट
करून तब्येत उतरवलेले किंवा तब्येत केलेले
सुद्धा त्यात सोशल मीडियाचा अल्गोरिथम अशा
प्रकारे काम करतो की एखाद्या
विषयाबद्दलच्या पोस्ट किंवा व्हिडिओ सारखे
बघितले तर फिल्डमध्ये तेच यायला सुरुवात
होते एखाद्या व्यक्तीला डायट करून जे
जमलंय ते आपल्यालाही जमेल असं भ्रम तयार
होतो आणि त्यातून मग श्रीनंदा सारखे
प्रकार घडतात पण श्रीनंदा सोबत नेमकं काय
घडलं तर 24 वर्षांची श्रीनंदा केरळच्या
कन्नूर जिल्ह्यातल्या कुतुबरंबा या गावात
राहायची घरात आई-वडील भाऊ आणि ती चार
लोकांचं सुखी कुटुंब श्रीनंदा डिग्रीच्या
पहिल्या वर्षाला शिकत होती.

 या वयातल्या
इतर कुणाही प्रमाणे श्रीनंदाला वाटायचं की
आपण चांगलं दिसलं पाहिजे पण आपलं वजन
वाढायला नको कारण जाड झालो तर आपण चांगले
दिसणार नाही हेच तिच्या डोक्यात यायचं मग
वजन कसं वाढणार नाही याबद्दल ती सोशल
मीडिया वरून माहिती घ्यायला लागली एक
व्हिडिओ बघितला दोन व्हिडिओ बघितले मग
तिच्या फीडवर वारंवार हेच व्हिडिओज यायला
लागले पण त्या व्हिडिओज मध्ये जी माहिती
दिली होती ती आपल्यासाठी आपल्या
तब्येतीसाठी योग्य आहे का याबद्दल
श्रीनंदानं कोणताच विचार केला नाही आणि
हीच गोष्ट तिच्या जीवावर बेतली
श्रीनंदाच्या घरच्यांनी दिलेल्या
माहितीनुसार साधारण वर्षभरापूर्वी youtube
आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डायट
बद्दलचे व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर तिने
खाणं कमी केलं.
 
 सुरुवातीला तिच्या
घरच्यांना वाटलं की अभ्यासाच्या टेन्शन
मुळे तिला जेवण जास्त जात नसेल पण बारावी
पास करून कॉलेजला गेली तरीही श्रीनंदा कमी
जेवायची भरपूर व्यायाम करायची आपलं वजन
कमी होतंय हे बघून तिला आनंद व्हायचा
बाकीच्या मित्र-मैत्रिणी वजन वाढतंय
म्हणून टेन्शन मध्ये होते पण आपण आपलं वजन
कमी करतोय आणि सगळ्यांपेक्षा वेगळे दिसतोय
त्यामुळे श्रीनंदा खुश होती हे तिच्या
वागण्यातून घरच्यांना जाणवायचं पण याचे
तिच्या शरीरावर नेमके काय परिणाम होतात
याचा अंदाज त्यांनाही नव्हता आणि स्वतः
श्रीनंदालाही हे सगळं सुरू असताना
श्रीनंदा डायटचे वेगवेगळे व्हिडिओ बघतच
होती श्रीनंदाला आणखी लवकर वजन कमी करायचं
होतं मग तिला समजलं की लिक्विड डायट फॉलो
केला तर वजन आणखी स्पीडन कमी होतं या
लिक्विड डायटच्या नादात श्रीनंदाने पोळी
भात भाज्या खाणं आधी कमी केलं आणि अचानक
बंदच करून टाकलं ती फक्त फळांचा ज्यूस
नारळ पाणी प्यायला लागली ती गोष्ट तिच्या
घरच्यांनाही खटकत होती साहजिकच ते तिला
जेवणाचं ताट बनवून द्यायचे पण श्रीनंदा हे
ताट लपून ठेवायची किंवा सरळ फेकून द्यायची
घरच्यांना आपण जेवलोय असंच सांगायची या
सगळ्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.

श्रीनंदा शरीराने अतिशय अशक्त झाली होती
तिच्या मित्र-मैत्रिणींच्याही ही गोष्ट
लक्षात आली तिच्या घरचेही काळजीत पडले
श्रीनंदाच्या शरीराची अवस्था अतिशय वाईट
झाली होती घरच्यांनी तिला दम देऊन खायला
लावलं पण श्रीनंदा म्हणायची ती पोट भरून
जेवण करते भूक आहे तेवढंच खाणार ना
भुकेच्या वर कसं खाणार तिच्या या प्रश्नात
उत्तर मात्र कुणाकडेच नव्हतं तिची खराब
झालेली तब्येत मागच्या काही दिवसांमध्ये
आणखी ढासळली मागच्या काही आठवड्यांपासून
श्रीनंदाला चालताना थकवा जाणवत होता एक
दोनदा तिला चक्कर आली घरच्यांनी धोक्याची
घंटा ओळखून तिला हॉस्पिटलमध्ये नेलं तिचं
चेकअप करून डॉक्टरांनी तिला काही गोळ्या
औषध दिली होती पण त्यामुळं काहीच फरक पडला
नाही तिचा त्रास आणखी वाढला तिला घरातल्या
घरात चालताही येईना पोटात पाणीही थांबेना
सतत उलट्या व्हायला लागल्या शेवटी
घरच्यांनी श्रीनंदाला मोठ्या
हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं जवळपास 12 दिवस
तिच्यावर उपचार सुरू होते.

 श्रीनंदा व्हेंटिलेटर वरच होती तिचं शरीर उपचाराला
काहीच प्रतिसाद देत नव्हतं 9 मार्चला
श्रीनंदाचा मृत्यू झाला काही
माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार तिला
हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तेव्हा
तिचं वजन 24 kg च्या आसपास होतं असं बोललं
जातंय पण श्रीनंदावर उपचार करणारे डॉक्टर
नागेश प्रभू यांनी श्रीनंदाच्या
मृत्यूबद्दल मानसिक आजाराचं कारण
सांगितलंय डॉक्टर प्रभू म्हणाले की
श्रीनंदाला अनोरेक्सिया नर्वोसा हा
खाण्यासंबंधीचा मानसिक विकार झाल्याची
शक्यता आहे तिला ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये
ऍडमिट केलं त्यावेळी तिच्यात उठून
बसायचेही त्राण उरले नव्हते त्यामुळे
तिच्यावर मानसिक उपचार करण्याची कुठलीच
संधी नव्हती बेडवर ती कायम झोपून होती
त्यामुळे तिचं नेमकं वजन किती होतं हे पण
चेक करणं अवघड होतं आता हा अनोरेक्सिया
नर्वोसा म्हणजे काय आणि तो होतो कसा
अनोरेक्सिया नर्वोसा हा आजार
आहारासंबंधीचा आहे आता काय खाणं चांगलं
काय वाईट हे आपण लहानपणापासून ऐकत असतो
तरीपण आपण बऱ्याच वेळा वेडवाकडं खातो.

प्रत्येक जण आपलं वजन वाढतंय किंवा कमी
होतंय याबद्दल बऱ्यापैकी जागरूक असतोच पण
अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण सतत
वजन खाणं याबद्दल विचार करायला लागतो
अनोरेक्सिया नर्वोसा या आजारात दोन
उपप्रकार आहेत पहिला रेस्ट्रिक्टिव्ह
नर्वोसा यात माणूस ठराविक प्रकारचं अन्नच
खायचं बंद करतो त्याला त्या अन्नाची भीती
बसते दुसरा उपप्रकार आहे बींज फर्ज
अनोरेक्सिया यात मात्र शरीरात प्रचंड
उलतापालत होते त्यात माणूस मधूनच एखाद्या
प्रकारचे पदार्थ खाणं पूर्ण बंद करतो
त्यांच्याकडे बघतही नाही तर चव घेणं
प्रचंड लांब राहिलं पण मध्येच हा माणूस
एखादा पदार्थ प्रचंड प्रमाणात खायला लागतो
पण खाऊन पचवण्याच्या आधीच खाल्लेलं अन्न
उलट्या करून बाहेर सुद्धा काढतो म्हणजेच
एखाद्या खाद्यपदार्थाबद्दल गुन्हा वाटायला
लागते मग तोच खाद्यपदार्थ आवडायला लागतो
आणि खाल्ल्यावर स्वतः बद्दल आणि त्या
अन्नाबद्दल तिरस्कारही वाढतो आता या
अनोरेक्सिया नर्वोसा आजाराची लक्षणं काय
आहेत तर विशिष्ट खाद्यप्रकारांविषयी मनात
भीती बसते अन्न कॅलरीज डायट याबद्दलचे
विचार तीव्र आणि टोकाचे होतात वजन
वाढण्याची प्रचंड भीती वाटते यातून आपण
वजन योग्य आहे की अयोग्य याचा अंदाज लावता
येत नाही स्वतःच्या खाण्यापिण्यावर ताबा
मिळवण्यासाठी तीव्र भावना निर्माण होतात.

पण यामुळे माणसात शारीरिक आणि मानसिक
दृष्ट्या काय बदल होतात तर अचानकपणे काही
पदार्थ किंवा ठराविक प्रकारचे पदार्थ खाणं
पूर्णच बंद करणं वजन कमी असलं तरी फॅटी
पदार्थांचा तिटकारा येणं अतिव्यायाम करणं
आपलं वजन उंचीच्या मानानं कमी असलं तरी
मान्य न करणं कमी झालेलं वजन लपवण्यासाठी
ढगळ कपडे घालणं घराच्या बाहेर पडणं किंवा
कार्यक्रमाला जाणं पूर्णपणे बंद करणं
काहीही खाल्ल्यानंतर लगेच बाथरूमला जावं
लागणं असे परिणाम या अनोरेक्सिया नर्वस
आजारामुळे होतात मग शरीराची झालेली
उपासमार आणि कुपोषित आहारामुळे शरीरात
काही लक्षणही दिसायला लागतात चक्कर येणं
थकवा येणं ब्लड प्रेशर कमी जास्त होणं पोट
दुखणं अनियमित मासिक पाळी त्वचा कोरडी
पडणं आणि जखमा लवकर बऱ्या न होणं असा
त्रास सुद्धा सुरू होतो 18 वर्षांची
श्रीनंदा या सगळ्या चक्रामधून गेली.

सुरुवातीला तिनं खाणं कमी केलं अतिव्यायाम
सुरू केला नंतर घनपदार्थ खाणं बंद केलं मग
तिच्या शरीराला त्याच आहाराची सवय लागली
पण अति उपासमार आणि कुपोषित आहारामुळे
तिच्या शरीरावर आणि मानसिक आरोग्यावर
परिणाम झाला भूक लागणंच बंद झालं नंतर
पोटात पाणीही टिकेना या सगळ्याची जाणीव
होईपर्यंत बराच उशीर झाला होता तिच्या
जठराला जखमा झाल्या होत्या रक्तातल्या
सोडियमचं प्रमाण खूपच कमी झालं होतं काही
माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यानुसार
श्रीनंदाच्या नातेवाईकांनी तिच्या
घरच्यांना मानसिक आरोग्य तज्ञांचा सल्ला
घ्यायला सांगितला होता पण श्रीनंदाच्या
घरच्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं स्वतः
श्रीनंदा ही कुठल्या तज्ञाचा सल्ला
घेण्याऐवजी सोशल मीडियावर बघितलेल्या
व्हिडिओज वर विसंबून राहिली आणि वयाच्या
अवघ्या 18 व्या वर्षी तिचा दुर्दैवी अंत
झाला तिच्यासमोर अन्न होतं पण तिची खायची
इच्छाच नव्हती ती इच्छा गेली होती मानसिक
विकारामुळे आणि सोशल मीडियावर व्हिडिओ
पाहून केलेल्या विचित्र डायटमुळं या
घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया
आम्हाला कमेंट करून नक्की सांगा 

Post a Comment

0 Comments