असे सगळा जवळपास दीडशे पोलिसांचा ताफा आरोपी दत्ता गाडे याला शोधण्यात गुंतला होता आणि रात्री एकच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेतले आहे एका गावाच्या शिवारामध्ये नदीकाठी तो कॅनॉल च्या शेजारी जाऊन तो झोपला होता आणि तिथूनच त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यानंतर आरोपीला थेट पुण्यामध्ये दाखल करण्यात आले रात्री अडीच वाजताच्या सुमारास लष्कर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेला आहे ही जी कारवाई स्वारगेट पोलिसांनी केलेली आहे तब्बल 75 तासानंतर आरोपीला ताब्यात देण्यात आलेले आहे.
आरोपीकडे मोबाईल होता पण तो मोबाईल त्याने दुसरीकडे ठेवल्यामुळे त्याचं लोकेशन ट्रेस करण्यास अडचण जात होती आणि त्या परिसरामध्ये उसाची शेती जास्त असल्यामुळे आरोपीला शोधणे हे कठीण जात होतं मात्र आरोपीला रात्री दीडच्या सुमारास तहान लागल्यामुळे आरोपी शेताच्या बाहेर आला त्यावेळीस आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीला आज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे.
0 Comments