राजूरतून वाहणाऱ्या वर्धा नदीत बुडून तीन युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर व्याहाळ जवळ वैनगंगा नदीत बुडून तीन संख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील वाहणाऱ्या वर्धा नदीवर महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन युवक दुपारच्या सुमारास अंघोळीला गेले होते. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही एका मागोमाग नदीत पडून वाहून गेले. तुषार आत्राम (वय वर्ष 18) मंगेश शंकापुरे (वय वर्ष 20) आणि अनिकेत कुडापे (वय वर्ष 18 )अशी युवकांची नावे आहेत.
युवक नदीत बुडाल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तिथ गर्दी केली पोलिसांनी स्थानिक मच्छीमाराच्या मदतीने शोध कार्य सुरू केले. शेवटचा वृद्ध हाती येईपर्यंत तिघांचेही मृतदेह शोधण्याचा कार्य युद्ध पातळीवर सुरू होतं. तर युवकांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तोच दुसऱ्या एका घटनेत वैनगंगा नदीत तीन संख्या बहिणी बुडाल्या यापैकी एकीचा मृतदेह गवसला असून इतर दोघींचा शोध सुरू आहे. चंद्रपूर गडचिरोली मार्गावरील व्याहाड इथं ही घटना घडली महाशिवरात्रीच्या निमित्ताने वैनगंगा नदीत अंघोळीसाठी उतरल्या मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाल्या कविता मंडळ प्रतिमा मंडळ आणि लिपिका मंडळ अशी या तिघ्या बहिणींची नावे आहेत.
0 Comments