Ticker

6/recent/ticker-posts

मक्केपल्ली येथे 'बाल स्नेही पंचायत' स्थापन करण्यात आली आणि विविध मंत्रिपदांची निवड करण्यात आली




*आज दिनांक 28/01/2025 रोज मंगळवार ला मक्केपल्ली येथे 'बाल स्नेही पंचायत' स्थापन करण्यात आली आणि विविध मंत्रिपदांची निवड करण्यात आली.*

*चामोर्शी तालुक्यातील मक्केपल्ली ग्रामपंचायती मध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी 'बाल स्नेही पंचायत' स्थापन करण्यात आली आहे. दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात ११ ते १८ वयाच्या 115 मुलांनी सहभाग घेतला. 'बाल स्नेही पंचायत'मध्ये ७ मुख्यमंत्रिपद, ७ उपमुख्यमंत्रिपदांसह विविध मंत्रिपदांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये शिक्षण मंत्री, उपशिक्षण मंत्री, बाल सुरक्षा मंत्री, उपसुरक्षा मंत्री, क्रीडा व सांस्कृतिक मंत्री, आरोग्य व स्वच्छता मंत्री, अन्न व पोषण मंत्री, नियोजन मंत्री, माहिती व प्रचार मंत्री आणि त्यांच्या उपमंत्रिपदांचा समावेश आहे.*

*ग्रामपंचायत मक्केपल्ली आणि 'मॅजिक बस इंडिया फाउंडेशन' यांच्या पुढाकाराने 'बाल स्नेही पंचायत' स्थापन करण्यात आली आहे, ज्यामुळे मुलांना नेतृत्व, सामाजिक जबाबदारी आणि सकारात्मक विचारांची शिकवण दिली जात आहे. या कार्यक्रमात ग्रामपंचायत मक्केपल्ली चे सरपंच आदित्य कांदो साहेब उपसरपंच देवनाथ भवरे, ग्रामपंचायत अधिकारी मुलकरवार सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, आशा ताई, तसेच श्री साईनाथ विद्यालय मक्केपल्ली शाळेचे मुख्याध्यापक रामने सर, आणि सहाय्यक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सोबतच CYL वैष्णवी बोधलकर तसेच युवा मार्गदर्शक- धीरज अलोने, सोनाली रणदिवे, पंकज शंभरकर यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पाडण्यात आला, वरील सर्व कार्यक्रम वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. प्रशांत लोखंडे सर यांच्या मार्गदर्शनात पार पडला*

Post a Comment

0 Comments