चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर ग्रामपंचायती मध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी 'बाल स्नेही पंचायत' स्थापन करण्यात आली आहे. 10 जानेवारी 2025 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात ११ ते १८ वयाच्या 187 मुलांनी सहभाग घेतला. 'बाल स्नेही पंचायत'मध्ये ७ मुख्यमंत्रिपद, ७ उपमुख्यमंत्रिपदांसह विविध मंत्रिपदांचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये शिक्षण मंत्री, उपशिक्षण मंत्री, बाल सुरक्षा मंत्री, उपसुरक्षा मंत्री, क्रीडा व सांस्कृतिक मंत्री, आरोग्य व स्वच्छता मंत्री, अन्न व पोषण मंत्री, नियोजन मंत्री, माहिती व प्रचार मंत्री आणि त्यांच्या उपमंत्रिपदांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत जयरामपूर आणि 'मॅजिक बस इंडिया फाउंडेशन' यांच्या पुढाकाराने 'बाल स्नेही पंचायत' स्थापन करण्यात आली आहे, ज्यामुळे मुलांना नेतृत्व, सामाजिक जबाबदारी आणि सकारात्मक विचारांची शिकवण दिली जात आहे. या कार्यक्रमात ग्रामपंचायत जयरामपूर चे सरपंच दीपाली सोयाम मॅडम, उपसरपंच छायाताई भोयर मॅडम, ग्रामविकास अधिकारी प्रतीक तारामत सर , जि. प. उच्च प्राथमिक शाळा जयरामपूर चे मु. अ. श्री. देवतळे सर, श्री. नरुलवार सर, साहाय्यक शिक्षक अंगावार मॅडम, सुरेश जगताप सर, वैशाली डोंगरवार मॅडम, निवंता वरदेलवार आकाश विद्यालय येथील अपूर्वा मॅडम, विकास गौरकर सर,जि. प. उच्च प्राथमिक शाळा जयरामपूर चे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ठेंगणे सर, ANM कुसराम मॅडम, CHO लेगांडे मॅडम, अंगणवाडी सेविका सुमानबाई अलोने, कौशल्य गौरकर, माया बंडावार 'मॅजिक बस'च्या तालुका समन्वयक योगिता सातपुते यांनी मुलांना 'बाल स्नेही पंचायत'चे महत्त्व सांगितले.
सर्व कार्यक्रमाची यशस्वी रचना युवामार्गदर्शक पल्लवी झरकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले. लवकरच बाल स्नेही पंचायत सोबत त्यांची कार्यप्रणाली समजून देण्यासाठी ग्रामपंचायत आणि मॅजिक बस त्यांच्यासोबत चर्चा सत्र घेणार आहेत. वरील सर्व सभा जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात पार पडला.
0 Comments