आज दिनांक 10/01/2025 रोज शुक्रवार ला ग्रामपंचायत कुंनघाडा (रै) येथे मुलांच्या तसेच गावाच्या विकासासाठी (Child Friendly Panchayat) 'बाल स्नेही ग्राम पंचायत' स्थापन करण्यात आली आहे. पंचायत राज मंत्रालय यांच्या शाश्वत विकासाचे उद्देश मध्ये ९ थीम मधील एक बाल स्नेही ग्राम पंचायत स्थापन करून मुलांच्या हिताचे काम करणे यामधे ११ ते १८ वयाच्या 195 विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. 'बाल स्नेही ग्राम पंचायत' मध्ये ७ मुख्यमंत्रि पद आणि ७ उपमुख्यमंत्री पद विविध मंत्रिपदांचा समावेश करण्यात आला.
यामध्ये शिक्षण मंत्री, उपशिक्षण मंत्री, बाल सुरक्षा मंत्री, उप बालसुरक्षा मंत्री, क्रीडा व सांस्कृतिक मंत्री, आरोग्य व स्वच्छता मंत्री, अन्न व पोषण मंत्री, नियोजन मंत्री, माहिती व प्रसार मंत्री आणि त्यांच्या उपमंत्रिपदांचा समावेश यामधे विद्यार्थ्यांना स्वतःमधील कौशल्या चा चांगला वापर कसा करता येणार आणि स्वतःच्या विकासा सोबतच गावाचा विकास करण्याची भूमिका पार कशी पाडता येणार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात जी.प.उच्च प्राथमिक केंद्र शाळा चे शिक्षक माननिय विजय दुधबावरे सर यांनी प्रास्तविक सांगितले तसेच विदयालयाचे शिक्षक श्री वाय ए धानोरकर सर, ता.समन्वयक दिनेश कामतवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला उपस्थित ए. जी. कोहळे सर सरपंच सौ अल्का धोडरे , ग्रामविकास अधिकारी रवींद्र कुणघाडकर साहेब , शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष श्री उमेश गझलपल्लीवार , लीलाधर वासेकर सर ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,सदस्य, अंगणवाडी मॅडम व ग्रापंचायत सदस्य आणि तालुका समन्वयक दिनेश कामतवार साहेब, तसेच युवा मार्गदर्शक अश्विनी उराडे, पंकज शंभरकर, राहुल वडेट्टीवार यांची उपस्थिती होती.
लवकरच बाल स्नेही ग्राम पंचायत सोबत त्यांची कार्यप्रणाली समजून घेण्यासाठी ग्रामपंचायत व मॅजिक बस त्यांच्यासोबत चर्चासत्र घेणार आहे.
वरील कार्यक्रम वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात पार पडला.
0 Comments