Ticker

6/recent/ticker-posts

Chandrapur:चंद्रपूर शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या


Chandrapur:चंद्रपूर शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या



चंद्रपूर शहरात घरफोड्या करणाऱ्या
चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात गुन्हे शाखा
पोलिसांना यश आला आहे पोलिसांनी चोरट्या
जवळून 19 लाख द हजार रुपयांचा मुद्देमाल
जप्त केला आहे पोलीस गस्त घालत असताना शहर
पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक संशयित
व्यक्ती फिरत असल्याची माहिती स्थानिक
गुन्हे शाखेला मिळाली.

 यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट येथील रहिवासी सुरेश महादेव कांबरे हा चोरीचे सोन्याचे दागिने विकण्यासाठी नेत असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे 2,61,000 किमतीचे सोन्याचे दागिने आढळूनआले.

 कसून चौकशी केल्यानंतर त्याने तळोधी
पोलीस स्टेशन हद्दीतील आकापूर येथे घरफोडी
केल्याची कबूली दिली अधिक तपासा दरम्यान
त्याने भद्रावती वरोरा सावली मूल तळोधी
आणि नागभेळ येथेही घरफोड्या केल्याचं उघड
झालं या एकूण 12 घर फोड्यांमध्ये तब्बल 19
लाख द हजार रुपये किमतीचे सोन्याचे आणि
चांदीचे दागिने तसेच रोकड जप्त करण्यात
आली आहे आरोपी हा सरराईत गुन्हेगार असून
तो अनेक गुन्ह्यांमध्ये फरार होता
त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून
पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे

Post a Comment

0 Comments